Join us  

कॅश कशाला; आता यूपीआयच करतो; डेबिट कार्डचा वापर झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 7:06 AM

भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये ‘यूपीआय’ ठरतेय वरचढ; डेबिट कार्डचा वापर झाला कमी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतात डिजिटल पेमेंटचा विस्तार वेगाने होत असून, यातही यूपीआय वरचढ ठरले आहे. २०२३ मध्ये यूपीआय व्यवहारांची संख्या वार्षिक ५६ टक्के दराने वाढली असून, ६५.७७ अब्ज डॉलरचे व्यवहार झाले आहेत. यूपीआयवरून पैसे पाठविण्यासाठी ग्राहकांनी सर्वाधिक पसंती सरकारी बँकांना दिली आहे, हे विशेष आहे.

ऑनलाइन व्यवहार कशासाठी?किराणा दुकानांमध्ये सर्वाधिक डिजिटल व्यवहार झाले आहेत. किराणा दुकान, मेडिकल, कपड्याचे दुकान, हॉटेल, हॉस्पिटल, सेवा स्टेशन, सरकारी सेवा यासाठी ६५ टक्के डिजिटल व्यवहार करण्यात आले.

यूपीआयचा वापर सर्वाधिक कुठे?किराणा सामान आणि सुपर मार्केट, खाण्याची ठिकाणे आणि रेस्टॉरंट्स, दूरसंचार सेवा, फास्ट फूड रेस्टॉरंट्स, डिपार्टमेंट स्टोअर्स, सर्व्हिस स्टेशन, डिजिटल साहित्य, बेकरी, औषधांची दुकाने आणि फार्मसी, डेबिट कार्ड ते वॉलेट क्रेडिट, वीज, गॅस, पाणी बिल.

क्रेडिट कार्डांची संख्या वाढलीडिसेंबर २०२३ मध्ये एकूण कार्डची संख्या १.३८४ अब्ज होती. यात वार्षिक ६ टक्के वाढ होत आहे. क्रेडिट कार्डांची संख्या ९७.९ दशलक्षवर पोहोचली आहे. डेबिट कार्डचा वापर कमी झाला आहे.

सर्वाधिक कार्ड कोण देतेय?nएचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय, ॲक्सिस आणि कोटक बँक क्रेडिट कार्ड देण्यात अग्रस्थानी आहेत. nडेबिट कार्ड देण्यात एसबीआय, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी आघाडीवर आहे.

मोबाइल व्यवहारांमध्ये किती वाढ?मोबाइल फोन व्यवहारांमध्ये गेल्या काही वर्षांत भरपूर वाढ झाली आहे. या व्यवहारांमध्ये यूपीआय व्यवहारावर आधारित व्यवहार सर्वाधिक असले, तरीही यात बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. मोबाइल व्यवहारांचे प्रमाण २०२२ मध्ये ४५.५८ अब्ज होते, यात ३८ टक्क्यांची वाढ होत हे व्यवहार ६२.९५ अब्जांवर गेले. या व्यवहारांवर शुल्क आकारले नाही तर या व्यवहारांमध्ये वाढ होत जाईल.

पैसे पाठविण्यासाठी कोणत्या बँकेला पसंती?

टॅग्स :बँकिंग क्षेत्रडिजिटलपे-टीएम