Join us

घाऊक महागाई उच्चांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:03 IST

घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर फेब्रुवारीत ६.५५ टक्क्यांवर पोहोचला असून, हा ३९ महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. खाद्यवस्तूंच्या किमती वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर फेब्रुवारीत ६.५५ टक्क्यांवर पोहोचला असून, हा ३९ महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. खाद्यवस्तूंच्या किमती वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर जानेवारीत ५.२५ टक्के होता. आज जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत खाद्याच्या किमतींत २.६९ टक्क्यांची वाढ झाली आहे. आदल्या महिन्यात ती 0.५६ टक्क्यावर होती. अन्नधान्ये, तांदूळ आणि फळे यांच्या किमती वाढल्यामुळे निर्देशांक वाढला आहे. इंधनाचे दरही या काळात २१.0२ टक्क्यांनी वाढले. आदल्या महिन्यात ही वाढ १८.१४ टक्के होती.डिसेंबरमधील महागाईच्या दराचे आकडे सरकार ३.३९ टक्क्यांवरून ३.६८ टक्के केले आहेत.