Join us

...तर मुंबईकरांचे वाचतील ४,६०० कोटी, अभ्यासातून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:40 IST

मुंबईकर त्यांच्या कामकाजाची आवश्यकता व गरजांना अनुरूप ठरतील, अशा ठिकाणी वास्तव्य करतील, तर दरवर्षी ते ४,६०० कोटी रुपयांपर्यंतची बचत करू शकतील, असे एका पाहणीत आढळले आहे.

मुंबई : मुंबईकर त्यांच्या कामकाजाची आवश्यकता व गरजांना अनुरूप ठरतील, अशा ठिकाणी वास्तव्य करतील, तर दरवर्षी ते ४,६०० कोटी रुपयांपर्यंतची बचत करू शकतील, असे एका पाहणीत आढळले आहे.प्रॉपर्टी पोर्टल नोब्रोकरने केलेल्या या अभ्यासात मुंबईकर सुयोग्य ठिकाणी राहणार असतील, तर त्यांचे वर्षभरात ४,६०० कोटी रुपये आणि प्रवासाच्या १.३५ लाख वर्षांची बचत होईल. आपापल्या कामकाजाला सुयोग्य ठरतील, अशी ठिकाणे मुंबईकरांनी निवडली, तर त्यांना प्रवासाचा जो त्रास होतो, त्यात लक्षणीय दिलासा मिळेल.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काम करणाºया लोकांची संख्या आहे ७८.२ लाख. त्यातील ६२.५ लाख लोक कामांसाठी आठवड्यातील पाच दिवस प्रवास करतात. फक्त ८ टक्के लोकच असे आहेत की, त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचायला १५ मिनिटे पुरतात. १२ टक्क्यांना १५ ते ३० मिनिटे लागतात व ८० टक्के लोकांना ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ कामाच्या ठिकाणी पोहोचायला लागतो व तेथून घरी यायला खर्च करते. याशिवाय मुंबईत देशातील सगळ््यात जास्त वाहनांची संख्या (३० लाख) असून, ते रोजच्या रोज रस्त्यांवर धावतात.>पर्यावरणाला फायदाकामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणाºया वेळेत जर लक्षणीय कपात झाली, तर जवळपास १.४१ दशलक्ष टन कार्बन (६३ दशलक्ष झाडांइतका) वातावरणात सोडला जाणे बंद होईल, असे हा अभ्यास म्हणतो.