गजानन मार्केटच्या अतिक्रमणावर कारवाई कधी? महाराष्ट्र बँड असोसिएशनचा सवाल
By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST
अकोला : रस्त्यालगत किरकोळ व्यवसाय मांडणार्या बँडवाल्यांच्या टपर्या जमीनदोस्त करणारे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर गजानन मार्केटच्या अतिक्रमणावर कधी चाल करतील, असा सवाल महाराष्ट्र बँड असोसिएशनच्यावतीने उपस्थित करण्यात आला. उपायुक्तांनी बँड वाजविणार्या व्यावसायिकांच्या साहित्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी असोसिएशनचे अध्यक्ष गजानन तायडे यांनी केली आहे.
गजानन मार्केटच्या अतिक्रमणावर कारवाई कधी? महाराष्ट्र बँड असोसिएशनचा सवाल
अकोला : रस्त्यालगत किरकोळ व्यवसाय मांडणार्या बँडवाल्यांच्या टपर्या जमीनदोस्त करणारे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर गजानन मार्केटच्या अतिक्रमणावर कधी चाल करतील, असा सवाल महाराष्ट्र बँड असोसिएशनच्यावतीने उपस्थित करण्यात आला. उपायुक्तांनी बँड वाजविणार्या व्यावसायिकांच्या साहित्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी असोसिएशनचे अध्यक्ष गजानन तायडे यांनी केली आहे.गांधी रोड, मदनलाल धिंग्रा चौक, जुने बस स्टॅँड, मोहम्मद अली मार्ग, दीपक चौक, नीती गेस्ट हाऊस रोड, ताजनगर, रेल्वे स्टेशन मार्गावर प्रचंड रहदारी असते. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला अतिक्रमणधारकांनी दुकाने थाटली आहेत. मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध नसून, आजवर मनपाने उपरोक्त ठिकाणच्या अतिक्रमणधारकांवर का कारवाई केली नाही, असा प्रश्न तायडे यांनी उपस्थित केला आहे. आधी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमकांना हुसकवा, बँड व्यावसायिकांच्या साहित्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी तायडे यांनी केली आहे.