Join us  

डिजिटल पेमेंटच्या यशाचा यापेक्षा भक्कम पुरावा काय?, महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 1:55 PM

देशातील नामवंत उद्योजक आणि महिंद्रा ब्रँडचे संचालक आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे

मुंबई - देशात मोदी सरकारच्या कार्यकाळात डिजिटल इंडियाला गती मिळाली. अगदी डिजिटल खरेदीपासून ते 7/12 उताराही डिजिटल स्वरुपात तुम्हाला उपलब्ध होऊ लागला. डिजिटल वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून तु्म्हाला शासकीय नोंदी ठेवता यायल्या. तसेच, जनधन योजना असेल किंवा शेतकरी सन्मान योजना असेल, थेट नागरिकांच्या बँक खात्यात रक्कम जमा व्हायली. आर्थिक व्यवहारातही गती आली, डिजिटल पेमेंट कार्यप्रणाली गावखेड्यात पोहोचली. 

देशातील नामवंत उद्योजक आणि महिंद्रा ब्रँडचे संचालक आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, देशात डिजिटल पेमेंट सिस्टीम किती खोलपर्यंत रुजलीय, याचा पुरावाच त्यांनी दिलाय. कारण, केवळ मोठ्या मॉलमध्ये किंवा मेगा सिटीतच डिजिटल पेमेंट कार्यप्रणाली अस्तित्वात असते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, आता गावखेड्यातील पानपट्टींवरही डिजिटल पेमेंटद्वारे पैशांची देवाण घेवाण होते.  अगदी चहाच्या दुकानांपासून ते पाणीपुरी भेळच्या गाड्यांपर्यंत. सामाजिक संस्थांपासून ते मंदिरातील दानपेटींपर्यंत आता डिजिटल पेमेंट सिस्टीम उपलब्ध झाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे स्वॅपिंग मिशन उपलब्ध असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर, आता आनंद महिंद्रा यांनीही एक व्हिडिओ शेअर करत, डिजिटल पेमेंट इन इंडिया कसं यशस्वी झालंय, हे सांगितलं. नंदीबैल घेऊन गावागावात, वस्तीवाड्यात येणाऱ्या नंदीबैलवाल्यानेही फोन पे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे, सुट्टे पैसे नाहीत, असं म्हणायचा विषयच नाही. महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांना आवडला असून 2 हजारांपेक्षा अधिक युजर्संने रिट्विटही केला आहे. तर, देशातील डिजिटल पेमेंट सुविधेचं यश सांगणारा हा व्हिडिओ आहे. 

टॅग्स :आनंद महिंद्राडिजिटलपे-टीएमव्यवसाय