Join us

लक्झरी व ग्राहक आले मात्र सुविधांचे काय? पार्किंग व्यवस्था नाही : मोठ्या खडीवरून चालणे ठरतेय कसरत

By admin | Updated: November 15, 2015 21:12 IST

जळगाव : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी खाजगी लक्झरी बसेसचा थांबा नेरी नाका परिसरात सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी लक्झरी व प्रवासी येऊ लागले आहेत. मात्र पार्किंग व्यवस्थेचा अभाव, बसस्टॅड परिसरातील बहुतांश भागात असलेला अंधार आणि थातूरमातूर केलेले खडीकरण यामुळे प्रवासी व लक्झरीमालकांची गैरसोय होत आहे.

जळगाव : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी खाजगी लक्झरी बसेसचा थांबा नेरी नाका परिसरात सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी लक्झरी व प्रवासी येऊ लागले आहेत. मात्र पार्किंग व्यवस्थेचा अभाव, बसस्टॅड परिसरातील बहुतांश भागात असलेला अंधार आणि थातूरमातूर केलेले खडीकरण यामुळे प्रवासी व लक्झरीमालकांची गैरसोय होत आहे.
शहरात वाहतुकीची होणारी कोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्हातंर्गत ट्रॅव्हल्सचा जसा एकाच जागी थांबा निि›त केला आहे. तसाच थांबा बाहेरगावी जाणार्‍या लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्ससाठी असावा यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी शहरातील ट्रॅव्हल्स मालकांशी चर्चा करुन नेरी नाका परिसरात विठ्ठल मंदीर संस्थानची दोन एकर जागा लक्झरी थांब्यासाठी निि›त केली आहे.
खडीकरण ठरतेय डोकेदुखी
विठ्ठल मदिंर संस्थान व ट्रॅव्हल्स मालक यांच्यात प्राथमिक करार झाला आहे. त्यानुसार मालकांनी नऊ लाख रुपये खर्च करुन जागेचे सपाटीकरण केले आहे. मात्र या ठिकाणी टाकण्यात आलेल्या खडीवर व्यवस्थित रोड रोलर फिरविण्यात न आल्यामुळे तसेच या खडीवर मुरूम अथवा कच न टाकल्याने मोठ्या खडी (दगड)वरूनच वापर सुरू आहे. त्यामुळे लक्झरी बसचे टायर खराब होत आहे. तसेच प्रवाशांना देखील सामानासह खडीवरून चालणे अवघड होत आहे. लक्झरी स्टॅडवर टाकण्यात आलेल्या खडीवर रोडरोलर फिरवून त्या खडीवर बारीक कच किंवा स्टोन क्रशर मशिनमधून निघणारा फफुटा टाकणे गरजेचे आहे.
अंधारामुळे लुटमारीचा धोका
नवीन लक्झरी बस थांबा हा आता चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झाला आहे. या ठिकाणी लक्झरी मालकांसोबत प्रवासी देखील येत आहेत. करारानुसार स्टॅड परिसरात लाईट बसविण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही अंधार राहत असल्याने लक्झरी चालक व प्रवासी यांच्यासाठी धोकादायक आहे. अंधार असलेल्या ठिकाणी गुन्हेगारी उपद्रव तसेच लुटमारीची व सामान चोरीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लक्झरी स्टॅड परिसरात अंधार असलेल्या ठिकाणी वीज बल्बची पुरेसी सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.