नवी दिल्ली : लोकसभेत नुकत्याच मंजूर झालेल्या भूसंपादन विधेयकाचे उद्योगजगताकडून स्वागत करण्यात येत आहे. यामुळे पायाभूत प्रकल्पांसह उत्पादन क्षेत्राला अनुकूल वातावरण तयार होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.काही उद्योगांकडून मात्र या विधेयकाच्या मूळ मसुद्यालाच अधिक पसंती आहे. तरीही नव्याने करण्यात आलेले बदल फारसे मारक नसल्याचे मत या उद्योगांकडून नोंदविण्यात आले आहेत.यापेक्षा कठोर तरतुदी असलेले विधेयक येईल, असे वाटत होते; परंतु मंजूर झालेले विधेयक ही एक चांगली सुरुवात आहे. मेक इन इंडियाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे, असे मत जेएलएल या जमीनविषयक सेवा देणाऱ्या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मयांक सक्सेना यांनी व्यक्त केले आहे. विधेयक लवकरच लागू होणे या क्षेत्रासाठी आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.गौरसन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज गौर म्हणाले की, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे विधेयक नक्कीच चांगले आहे. यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेला गती येईल.
भूसंपादन विधेयकाचे उद्योगजगतातून स्वागत
By admin | Updated: March 13, 2015 00:31 IST