नवी दिल्ली : धोरणात्मक व्याजदर कपातीचे रिझर्व्ह बँकेचे पाऊल अर्थव्यवस्थेसाठी एक उत्साहवर्धक असून, त्यामुळे बँकांना व्याजदर घटविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.रिझर्व्ह बँकेने मंगळवारी रेपो दरात पाव टक्का कपात केली. या पार्श्वभूमीवर अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले की, रिझर्व्ह बँकेचे आजचे पाऊल स्वागतार्ह आहे. त्यामुळे निश्चितच अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळेल. सिन्हा म्हणाले की, अर्थसंकल्पातील राजकोषीय सुधारणा आणि अन्य सुधारणा यांचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळे पतधोरण अधिक करण्यास वाव आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर व्यवसाय आणि उत्पादनावरील खर्च कमी होईल. उत्पादन आणि पायाभूत क्षेत्रात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी कमी व्याजदर असणारी प्रणाली विकसित करावी लागेल. आर्थिक बाबींचे सचिव शक्तिकांत दास म्हणाले , काही बँकांनी एमसीएलआर तहत आपल्या व्याजदरांचे यापूर्वीच सुसूत्रीकरण केले आहे. त्यानुसार कपात केली आहे.
व्याजदर कपातीचे केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 04:48 IST