Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळे सेवाकर विभागाच्या रडारवर!

By admin | Updated: August 15, 2014 00:02 IST

दिमाखदार लग्न सोहळ्यापासून ते घरगुती सोहळ््याच्या किंवा कंपनीच्या सोहळ््याच्या प्रसिद्धीपर्यंत कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना आता अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे

मनोज गडनीस, मुंबईदिमाखदार लग्न सोहळ्यापासून ते घरगुती सोहळ््याच्या किंवा कंपनीच्या सोहळ््याच्या प्रसिद्धीपर्यंत कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना आता अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे, कारण या आणि अशा सर्व गोष्टींत ‘सेवा’ दडलेली असल्याने त्यावर ‘सेवा कर’ भरणे बंधनकारक आहे, अन्यथा सेवा कर विभागाचे अधिकारी तुमच्या ऐन कार्यक्रमात दाखल होऊन पार्टीच्या रंगाचा बेरंग करू शकतात. केंद्रीय अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष कराच्या लक्ष्यामध्ये वाढ केल्यानंतर, कर वसुली हे आव्हानात्मक असल्याची विभागांतर्गत चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर देशभरातील सेवा कर आयुक्तांची वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याशी बैठक झाली आहे. त्यात थेट वित्तमंत्र्यांनीच या अधिकाऱ्यांना ‘सक्रिय’ होण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.‘सक्रिय’ होणे म्हणजे नेमके काय करायचे यावर देखील या बैठकीत विस्तृत ऊहापोह झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध शहरांत अथवा गावात होणारे दिमाखदार लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, सिनेतारकांचे कार्यक्रम यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.एखाद्या ठिकाणी मंडप उभारला असेल तर गरज भासली तर तिथे जाऊन चौकशी करून सेवा कर लागू होत असल्यास वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.चालू आर्थिक वर्षाकरिता अप्रत्यक्ष कराचे लक्ष्य सहा लाख २४ हजार कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.२०१३-१४ या आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष कराचे संकलन चार लाख ९६ हजार कोटी रुपये इतके झाले होते. त्या तुलनेत यंदाचे लक्ष्य २६ टक्के अधिक आहे.