Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईची चाहूल; सराफ्यात तेजी

By admin | Updated: August 31, 2015 22:20 IST

सोने आणि चांदीच्या बाजारात नवी दिल्लीत आज तेजी दिसून आली. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला १६० रुपयांनी वाढून २६,८६० रुपये इतके झाले. तर चांदीचे

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या बाजारात नवी दिल्लीत आज तेजी दिसून आली. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला १६० रुपयांनी वाढून २६,८६० रुपये इतके झाले. तर चांदीचे दर प्रति किलोला ३५,००० रुपये इतके झाले आहेत.चांदीच्या बाजारात आज प्रति किलोमागे २०० रुपयांची वाढ झाली. बाजारातील तज्ञांनी सांगितले की, आगामी काळात विवाहाचे नियोजन म्हणून सोने, चांदीची खरेदी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून दरात वाढ होत आहे. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीची किंमत ३0 रुपयांनी वाढून ३४,३२५ रुपये किलो झाली. चांदीचे शिक्के आज एक हजार रुपयांनी वाढले असून खरेदीची किंमत ५१ हजार रुपये, विक्रीची किंमत ५२ हजार रुपये प्रति शेकडा राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सिंगापूरमध्ये सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ होवून सोने ११३४.१२ डॉलर प्रति औंस एवढे झाले. तर नवी दिल्लीत अनुक्रमे ९९.९ आणि ९९.५ टक्के शुध्दतेच्या सोन्याचे दर १६० रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे वाढले. ते अनुक्रमे २६,८६० व २६,७१० रुपये याप्रमाणे होते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले आहेत.