Join us  

सहकारी बँकिंगबाबत ‘लोकमत’तर्फे वेबिनार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 1:18 AM

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख पाहुणे

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी बॅँका आणि पतसंस्थांचे स्थान महत्त्वाचे आहे. या संस्थांसाठी केंद्र सरकारने एक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाबाबत सर्व काही जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’तर्फे मंगळवार, दि. ११ रोजी ११ वाजता वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

या वेबिनारमध्ये जी-२० आणि जी-७ परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे  खासदार सुरेश प्रभू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रीफोसचे सहसंस्थापक आणि सीईओ व्ही. आर गोविंदराजन, नाईट फिनटेकचे संस्थापक आणि सीईओ कुशल रस्तोगी, पुणे पीपल्स को-अॉपरेटिव्ह बँकेचे (मल्टी स्टेट बँक) चेअरमन जनार्दन  रणदिवे आणि एनएएफसीयूबीचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता उपस्थित राहणार आहेत.लोकमतने आयोजित केलेल्या  को ऑपरेटिव्ह बँक अँड क्रेडिट सोसायटीच्या वेबिनारचे पार्टनर पुढीलप्रमाणे आहेत. को पॉवर्डबाय स्पॉन्सर प्रीफोस, असोसिएट्स पार्टनर - नाइट फिनटेक, पुणे पिपल्स को ऑपरेटिव्ह बँक. या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी  https://bit.ly/LokmatWebinar येथे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :बँकिंग क्षेत्र