ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना अपेक्षित असलेल्या सगळ्या विषयांवर चर्चा करण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचे सांगितले आहे. रेल्वे बजेट असो, मुख्य बजेट असो वा राष्ट्रपतींच्या भाषणावर व्होट ऑफ थँक्स असो आम्ही सगळ्या विषयांवर बोलण्यास तयार आहोत असे नायडू यांनी स्पष्ट केले आहे.
त्याखेरीज जेएनयू प्रकरण, हैदराबादमधला आरक्षणाचा मुद्दा याबरोबरच अध्यक्ष परवानगी देतील त्या प्रत्येक विषयावर चर्चेची आमची तयारी आहे असे नायडू यांनी स्पष्ट केले आहे. सरकार जवाहरलाल नेहरू विद्यापीठ बंद करणार नाही असेही नायडूंनी स्पष्ट केले आहे.
हे विद्यापीठी बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे चुकीचे वृत्त पसरवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.