Join us  

PAN Card मध्ये नाव, पत्ता, जन्म तारीख, मोबाइल नंबर बदलायचाय? जाणून घ्या प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 9:39 AM

अनेक आर्थिक व्यवहारांसाठी हे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या पॅनमध्ये काही चुकीची माहिती असेल तर मोठा त्रास होऊ शकतो.

आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड (PAN Card) हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. याशिवाय, तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार नाही किंवा म्युच्युअल फंड योजनांमध्येही गुंतवणूक करू शकणार नाही. बँक खातं उघडण्यासाठी देखील पॅन क्रमांक आवश्यक आहे. अनेक आर्थिक व्यवहारांसाठी हे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या पॅनमध्ये काही चुकीची माहिती असेल तर मोठा त्रास होऊ शकतो. पॅन कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर यात काही चूक असेल तर ती कशी दुरुस्त करू शकता हे आज आपण जाणून घेऊ. 

ऑनलाइन कसं कराल अपडेट? 

  • NSDL ई-गव्हर्नन्स वेबसाइटद्वारे पॅन अपडेट करण्यासाठी, ई-गव्हर्नन्स पोर्टलला भेट द्या. 
  • यानंतर 'सर्व्हिसेस' टॅबवर जा आणि ड्रॉपडाउन मेनूमधून 'पॅन' निवडा. 
  • नंतर 'PAN डेटामधील करेक्शन्स' मेन्यू शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि 'अप्लाय' हा पर्याय निवडा. 
  • 'पॅन कार्डमधील बदल / करेक्शन' टॅब अंतर्गत 'लागू करण्यासाठी क्लिक करा'. 
  • दस्तऐवज सबमिट करण्याची पद्धत निवडा, तुमचा पॅन क्रमांक एन्टर करा, पॅन कार्ड मोड निवडा आणि 'सबमिट' वर क्लिक करा. 
  • नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एक टोकन क्रमांक मिळेल. त्यानंतर ओके क्लिक करा. 
  • तुमचं नाव आणि पत्ता भरा. त्यानंतर 'Next Step' वर क्लिक करा. 
  • व्हेरिफिकेशनसाठी तुमचा पॅन क्रमांक एंटर करा आणि 'नेक्स्ट स्टेप'वर क्लिक करा. 
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि नंतर 'सबमिट' बटणावर क्लिक करा. 
  • टीप: पॅन दुरुस्ती साधारणतः १५ दिवसांचा कालावधी लागतो. तुमचं पॅन कार्ड पोस्टानं पाठवल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर एक मेसेज मिळेल. 

पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल, पासपोर्ट, बँक स्टेटमेंट आणि ड्रायव्हिंग लायसन्स या कागदपत्रांच्या मदतीनं तुम्ही तुम्ही तुमचं पॅन अपडेट करू शकता.

टॅग्स :पॅन कार्डआधार कार्ड