Join us

आॅनलाईन ईपीएफ काढण्यास काही महिन्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: March 15, 2015 23:49 IST

भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या पाच कोटी सदस्यांना (अंशधारक) भविष्य निर्वाह निधी आॅनलाईन काढता येईल यासाठी प्रयत्नशील आहे

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या पाच कोटी सदस्यांना (अंशधारक) भविष्य निर्वाह निधी आॅनलाईन काढता येईल यासाठी प्रयत्नशील आहे. तथापि, या सोयीचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी आणखी काही महिने वाट बघावी लागणार आहे. ईपीएफओ ही आॅनलाईन सोय पूर्णपणे निर्दोष बनवू इच्छिते. ही सोय उपलब्ध झाल्यानंतरच सदस्यांना आॅनलाईन पैसे काढण्याची सुविधा मिळेल.