Join us  

Vodafone Idea च्या धमाकेदार प्लॅनने उडवली Jio, Airtel ची झोप! दररोज 1.5GB डेटा अन् बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 3:43 PM

Vodafone Idea : प्लॅनमध्ये Vi Hero Unlimited बेनिफिट्सचा सुद्धा समावेश आहे.

नवी दिल्ली : Vodafone Idea (Vi) भारतात राहणाऱ्या प्रीपेड ग्राहकांसाठी 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे याची व्हॅलिटीडी 70 दिवसांची आहे. डेटाच्या बाबतीत, युजर्संना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह 1.5GB डेली डेटा मिळतो. दरम्यान, जिओ आणि एअरटेलचे प्लान्स अयशस्वी ठरले आहेत. जिओचा 699 रुपयांचा आणि एअरटेलचा  719 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करतो. 

प्लॅनमध्ये Vi Hero Unlimited बेनिफिट्सचा सुद्धा समावेश आहे. ज्यामध्ये डेटा डिलाईट्स, वीकेंड रोलओव्हर आणि बिंज ऑल नाईट ऑफरचा समावेश आहे. सर्व अतिरिक्त ऑफर युजर्सचा डेटा वापर अनुभव वाढवण्यासाठी आहेत. हा प्लॅन जिओ आणि एअरटेलच्या 84 दिवसांच्या प्लॅन पेक्षा खूप चांगला आहे.

14 दिवस अधिक सेवा घेण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. जिओच्या 666 रुपयांच्या आणि एअरटेलच्या 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. त्या प्लॅनमध्ये 1.5 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे Vi चा 599 रुपयांचा प्लॅन चांगला वाटतो. Vi आपल्या प्लॅनसह ग्राहकांना अतिरिक्त ऑफर देत आहे. Vi च्या 84 दिवसांच्या प्लॅनमध्ये 1.5GB दैनंदिन डेटासाठी 719 रुपये खर्च येतो, तर 70 दिवसांच्या प्लॅनचा ग्राहकांना खूप फायदा होत आहे.

Vi च्या 599 रुपयांच्या प्लॅनचे बेनिफिट्स599 रुपयांच्या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV Classic चे ओव्हर-द-टॉप (OTT) चे लाभ देखील समाविष्ट आहेत. जर तुम्हाला थोडा कमी खर्च करायचा असेल आणि मध्यम मुदतीसाठी प्रीपेड प्लॅन हवा असेल तर Vi चा  599 रुपयांचा प्लॅन हा एक चांगला पर्याय आहे. जर युजर्स Vi कडून 599 रुपयांचा प्लॅन निवडत असेल, तर तो मोबाईल सेवांसाठी दररोज 8.56 रुपये खर्च करेल. 

टॅग्स :व्होडाफोनआयडिया