Join us  

तुमच्या फाेनमध्ये व्हायरस? हल्ल्यांमध्ये ६००% वाढ, चोरीसाठी कॉर्पोरेट उपकरणांमध्ये शिरकाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:29 PM

मागील ३ वर्षांत डेटा चोरीच्या उद्देशाने विविध उपकरणांवर होणाऱ्या मालवेअरच्या हल्ल्यांची संख्या ६०० टक्के वाढली आहे.

नवी दिल्ली : मागील ३ वर्षांत डेटा चोरीच्या उद्देशाने विविध उपकरणांवर होणाऱ्या मालवेअरच्या हल्ल्यांची संख्या ६०० टक्के वाढली आहे. सायबर सुरक्षा संस्था ‘डिजिटल फुटप्रिंट इंटेलिजन्स’च्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वैयक्तिक आणि कॉर्पोरेट उपकरणांत डेटा चोरी करणाऱ्या मालवेअरचा शिरकाव २०२३ मध्ये लाखोंच्या घरात गेला आहे.  

डेटा चोरी करणाऱ्या मालवेअरचा फटका बसलेले ग्राहक आणि व्यवसायांची संख्या २०२३ मध्ये १ कोटीपेक्षा अधिक झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी एका उपकरणातून सरासरी ५०.९ लॉगइनची माहिती चोरली आहे.  

विक्रीसाठी पॅकेट 

चोरण्यात आलेला डेटा विकला जातो. त्यासाठी सब्सक्रिप्शन सेवा आणि सामान्य सेवा यांसारखे ॲग्रिगेटर असतात.  

लाॅगइन माहितीला अमेरिकी डॉलरमध्ये किंमत येते. १० लॉगइनच्या फाइल्सचे पॅकेट तयार करून विकले जाते. मागील ५ वर्षांत ४,४३,००० वेबसाइटच्या लॉगइन माहितीची चोरी झाली आहे.

टॅग्स :सायबर क्राइम