मुंबई : डिझेलच्या किमती सरकारने नियंत्रणमुक्त करून बाजाराशी संलग्न केल्यानंतर अनुदानापोटी रक्कम वाचतानाच एकूणच भांडवल उपलब्धी मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने रिझर्व्ह बँकेला व्याजदर कपात करण्यास पुरेपूर वाव असल्याची प्रतिक्रिया अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारी २०१३ पासून महिन्याकाठी डिझेलच्या किमती अंशत: नियंत्रणमुक्त करतानाच महिन्याकाठी प्रति लीटर ५० पैशांची वाढ केल्यामुळे ११ महिन्यांत डिझेलवरील प्रती लीटर तोटा भरून काढण्यात तेल कंपन्यांना यश आले. त्याचबरोबर कच्चा तेलाच्या किमतीतही प्रति बॅरल १०३ वरून ८३ डॉलरपर्यंत घट झाली. यामुळे डिझेलच्या किमती ३.५७ रुपयांपर्यंत कमी करण्यात तेल कंपन्यांना यश आले. (प्रतिनिधी)
व्याजदर कपात करणे दृष्टिपथात
By admin | Updated: October 22, 2014 06:11 IST