Join us  

व्हिडीओकॉन दिवाळखोरीत; ११ कंपन्यांचा लिलाव सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 3:40 AM

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील नामांकित व्हिडीओकॉन कंपनी दिवाळखोरीत गेली आहे. राष्टÑीय कंपनी कायदा लवादाच्या (एनसीएलटी) आदेशानुसार समूहातील ११ कंपन्यांच्या लिलावाची प्रक्रिया बुधवारी सुरू झाली. कंपनीने २० हजार कोटींचे कर्ज थकविले आहे.

मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील नामांकित व्हिडीओकॉन कंपनी दिवाळखोरीत गेली आहे. राष्टÑीय कंपनी कायदा लवादाच्या (एनसीएलटी) आदेशानुसार समूहातील ११ कंपन्यांच्या लिलावाची प्रक्रिया बुधवारी सुरू झाली. कंपनीने २० हजार कोटींचे कर्ज थकविले आहे.प्रसिद्ध उद्योजक वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन कंपनी लिमिटेडमध्ये (व्हीआयएल) एकूण १५ कंपन्या आहेत. व्हीआयएलच्या डोक्यावर २० हजार कोटींचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्याने कंपनीनेच नादारी व दिवाळखोरी नियमांतर्गत लिलावासाठी एनसीएलटीकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे.या लिलाव प्रक्रियेसाठी एनसीएलटीने अनुज जैन यांची नेमणूक केली. जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओकॉन समूहातील ११ कंपन्यांचा लिलाव एकत्रितपणे होणार आहे. समूहातील अन्य चार कंपन्यांसंबंधीचे प्रकरण एनसीएलटीकडे प्रलंबित आहे. त्याबाबत लवादाकडून आम्हाला लवकरच आदेश येण्याची शक्यता आहे.कोचर प्रकरणातहीआयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करीत स्वत:चे पती व्यवस्थापकीय संचालक असलेल्या नूपॉवर या कंपनीला ३,२५० कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप आहे. ते कर्ज बुडीत खात्यात गेले. या कंपनीत धूत भागीदार असल्याचे उघड झाले. बँकेकडून याची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :व्यवसायबातम्या