पुरोगामी पॅनलचा विजय
By admin | Updated: April 14, 2015 00:06 IST
फोटो हार्ड कॉपी ....
पुरोगामी पॅनलचा विजय
फोटो हार्ड कॉपी ....पुरोगामी पॅनलचा विजयनागपूर : जवाहर विद्यार्थी गृह संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत रमेश गिरडेप्रणीत गिरडे, ढोबळे, घवघवे, पाहुणे आणि भुते यांच्या सत्तारूढ पुरोगामी पॅनलचा दणदणीत विजय झाला. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत या पॅनलने कुंभलकर व रेवतकर पुरस्कृत संताजी विकास पॅनलचा पराभव केला. पुरोगामी पॅनलचे सर्व १९ उमेदवार प्रचंड मतधिक्याने विजयी झाले आहेत. अध्यक्ष रमेश गिरडे यांना २२२३ तर धर्मराज रेवतकर यांना ९०७ मते मिळाली. इतर विजयी उमेदवारांमध्ये उपाध्यक्ष गुलाब जुननकर, मुख्य कार्यवाह शंकरराव भुते, सहकार्यवाह मिलिंद माकडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत ढोबळे तर कार्यकारिणी सदस्यांमध्ये दिलीप तुपकर, चंद्रशेखर बाळबुधे, रामकुमार मोटघरे, नरेंद्र दिवटे, प्रमोद महाजन, शेषराव सावरकर, मंगेश घवघवे, प्रशांत पाहुणे, प्रदीप लाखे, डॉ. दामोदर सातपुते, गोविंद भेंडे, रवी उराडे, बालानंद टापरे, बबीता मेहर आदींचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. नितीन तेलगोटे यांनी तर सहायक अधिकारी म्हणून ॲड. कमलाकर व ॲड. काझी यांनी काम पाहिले.