नवी दिल्ली : एप्रिलमध्ये सर्व क्षेत्रांतील वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या विक्रीत १३.३ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या १,२६,५६९ कार विकल्या. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये ही संख्या १,११,७४८ कार इतकी होती. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत १६.२ टक्के वाढ झाली. तसेच निर्यातीत १३.७ टक्के घट झाली आहे. सर्वांत लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या आॅल्टो आणि वॅगनआर या छोट्या गाड्यांच्या विक्रीत मात्र ९.९ टक्के घट झाली आहे. स्विफ्ट, एस्टिलो, रिट्ज, डिझायर आणि बलेनो या गाड्यांची विक्री ८ टक्के वाढली.ह्युंदाईच्या कारविक्रीत ५.७ टक्के वाढ झाली आहे. ५४,४२0 गाड्या कंपनीने एप्रिलमध्ये विकल्या. गेल्या वर्षी ही संख्या ५१,५0५ होती. देशांतर्गत विक्रीत ९.७ टक्के वाढ, तर निर्यातीत ६.५ टक्के घट झाली.
वाहनविक्रीचा टॉप गीअर
By admin | Updated: May 3, 2016 02:56 IST