Join us  

ऑगस्टमध्ये वाढली वाहन विक्री, व्यापारी वाहनांमध्ये मात्र मंदी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 7:29 AM

कंपनीच्या क्रेटा, वेर्ना, टुसो, नियोस आणि औरा या मॉडेलना चांगली मागणी होती.

नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये देशातील कार आणि दुचाकींची विक्री वाढली असली तरी व्यापारी वाहनांच्या विक्रीमध्ये मात्र घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील देशातील वाहन विक्रीमध्ये दुचाकी आणि कारची विक्री वाढली आहे. मारुती सुझुकी या सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीच्या विक्रीमध्ये २०.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या मिनी कारना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. ह्युंडाई मोटर्सच्या कार विक्रीमध्ये १९.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या क्रेटा, वेर्ना, टुसो, नियोस आणि औरा या मॉडेलना चांगली मागणी होती.महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या विक्रीमध्ये गत महिन्यामध्ये एक टक्क्याने वाढ झालेली दिसून आली. कार, व्हॅन आणि बहुउपयोगी वाहनांना चांगली मागणी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. पिकअप व्हॅन आणि एसयूव्हीच्या मागणीमध्ये चांगली वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये टोयोटा किर्लाेस्कर मोटर्सच्या विक्रीमध्ये मात्र ४८ घट झालेली दिसून येते. देशाच्या काही भागामध्ये अद्यापही कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याचा फटका कंपनीला बसला आहे. हिरो मोटोकॉर्पच्या देशांतर्गत विक्रीमध्ये आॅगस्ट महिन्यामध्ये ८.५२ टक्के एवढी वाढ झाली आहे. मात्र अन्य दुचाकी उत्पादकांच्या विक्रीमध्ये घट नोंदविली गेली आहे. सुझुकी मोटरसायकलची विक्री देशांतर्गत १५.३५ टक्के तर रॉयल एन्फिल्डची विक्री पाच टक्के घटली आहे. व्यापारी वाहन विक्रीमध्ये अद्याप जोर नाही. अशोक लेलॅण्ड आणि व्हीव्ही कमर्शियल व्हेईकल्स या कंपन्याची विक्री ३० टक्क्यांनी घटली आहे.>ट्रॅक्टर सुसाट; विक्रीत ८० टक्क्यांची वाढशेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या ट्रॅक्टरची विक्री आॅगस्ट महिन्यामध्ये सुसाट झाली आहे. महिंद्र ट्रॅक्टर्सने गत महिन्यामध्ये २४,५७८ ट्रॅक्टरची विक्री करून ६५ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.याशिवाय एस्कार्ट अ‍ॅग्री मशिनरीच्या ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये ८०.१ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. आॅगस्टमध्ये या कंपनीच्या ७,२६८ ट्रॅक्टरांची विक्री झाली आहे.सोनालिका या अन्य ट्रॅक्टर कंपनीने आपला मागील विक्रम मोडीत काढून नव्या विक्रमाची नोंद केली आहे. या कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने ८,२०५ ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे.