Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाला-दुचाकीची धडक; युवक ठार

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यावर वाहनाला पाठीमागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. कमलेश महादेव गुंडाळ ( वय २८, रा. खरपुडी खंडोबाची, ता. खेड, जि. पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात काल ( ता. १३ ) रात्री साडेआठ वाजता नाणेकरवाडीच्या हद्दीत झाला. कमलेश हा आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एम. एच. ४३ ए. एच. ६९३९) वरून तळेगाव बाजूकडून चाकणला जात होता. या वेळी पुढे चाललेल्या वाहनाला त्याची दुचाकी धडकली. यामुळे कमलेश खाली पडून, त्याला गंभीर दुखापत झाली. यात त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर काळूराम ज्ञानेश्वर चव्हाण (वय ३५, रा. चांडोली, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.
---------