Join us

भाज्या व डाळी कडाडल्या

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

संबंधित फोटो घेता येईल ..

संबंधित फोटो घेता येईल ..

भाज्या व डाळी कडाडल्या
- सामान्यांचे बजेटवर घात : शासनाने भाववाढीवर नियंत्रण आणावे

नागपूर : डाळी आणि भाज्यांच्या वाढीव किमतीने महागाईत पुन्हा भर टाकली आहे. पुढील काही दिवसांत भाव कमी होण्याचे काहीही संकेत नसल्यामुळे गृहिणींचे धाबे दणाणले आहे. भाववाढीवर नियंत्रणासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
कॉटन मार्केटमध्ये रविवारी लहानमोठ्या ८० ते १२० गाड्यांनी भाज्यांची आवक होती. जवळपास १०० पेक्षा जास्त गाड्या नागपूर आणि लगतच्या परिसरातून विक्रीस आल्या. काहीच भाज्या वगळता बहुतांश भाज्यांचे भाव वधारले होते. रविवारी ठोकमध्ये कोथिंबीर प्रति किलो ४० रुपये तर हिरवी मिरचीचे भाव २० ते २५ रुपये होते. किरकोळमध्ये वाढीव भावात विक्री झाली.
डाळींची वाढीव भावातच विक्री
तूर आणि उडद डाळीचे भाव प्रति किलो १०० रुपयांपेक्षा जास्त आहेत. गेल्या गेल्या तीन महिन्यात भावात काहीही घसरण झालेली नाही. शिवाय केंद्र सरकारची आयातीची घोषणाही मागे पडली आहे. यावर्षी तुरीचे पीक कमी येण्याचा अंदाज वर्तविला जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी पुन्हा भाव वाढविल्याची माहिती आहे. सरकारी धोरण आणि साठेबाजांमुळे भाववाढ झाली असून शासनाने साठेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच कांद्यानेही महागाई वाढविण्यात हातभार लावला आहे.

बॉक्स
पालेभाज्याकिरकोळ दर
वांगे१५ रु.
फुलकोबी३० रु.
पत्ताकोबी१५ रु.
हिरवी मिरची३० रु.
सिमला मिरची ४० रु.
कोथिंबीर५० रु.
टमाटर३० रु.
भेंडी३० रु.
चवळी शेंग२५ रु.
गवार शेंग३० रु.
कारले५० रु.
काकडी३० रु.
मुळा३० रु.
गाजर३० रु.
मेथी५० रु.
पालक२० रु.
चवळी ३०
कोहळे२० रु.
लवकी२० रु.
कच्चे आंबे२५ रु.
तोंडले३० रु.
ढेमस४० रु.
परवळ४० रु