Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन घटल्याने भाजीपाला ५० टक्क्यांनी महागला !

By admin | Updated: May 3, 2016 04:22 IST

उन्हाच्या काहिलीने अंग भाजून निघत असतानाच आता याच उन्हाचा फटका भाजीपाल्यालाही बसला असून गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत यंदा भाजीपाला किमान ३० ते कमाल

मुंबई : उन्हाच्या काहिलीने अंग भाजून निघत असतानाच आता याच उन्हाचा फटका भाजीपाल्यालाही बसला असून गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत यंदा भाजीपाला किमान ३० ते कमाल ५० टक्क्यांनी महागल्याचे वृत्त आहे. वास्तविक उन्हाळा जसजसा वाढतो, तसतसे भाज्यांच्या पुरवठ्याचे प्रमाण घटत जाते. परिणामी, भाज्यांचे भाव भडकतात असा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र ही स्थिती साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जाणवते. परंतु, यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापासून तापमानवाढ नोंदली गेली आहे. याचा परिणाम भाज्यांचे भाव भडकण्याच्या रूपाने दिसत आहे. यंदा देशभरातच उन्हाळा तीव्र आहे. यामुळे पाणीपुरवठ्याचेही प्रमाण घटल्यामुळे याचा फटका भाज्यांचा उत्पादनाला बसत आहे. त्यातच नाशवंत अशा भाजीपाल्याला किमान मुदतीत राखण्यास पुरेशी व्यवस्था नसल्याने बाहेरील वाढीव तापमानामुळेही भाज्यांची नासाडी होण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी किमती वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)अशी झाली दरवाढ...- मटार, टोमॅटो, सिमला मिरची आदी घटकांच्या किमतीमध्ये 20-50% वाढ झाली आहे. - मुंबईत सिमला मिरचीच्या किमती या सर्वाधिक म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. - चवळी, मेथी, पालक, लालमाठ अशा पालेभाज्यांच्या किमतीही २२ ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी सरासरी १० रुपयांना मिळणारी पालेभाज्यांची एक जुडी सध्या १२ ते १५ रुपये दराने विकली जात आहे- उन्हाळ्यात थंड लिंबाचे सरबत पिणेही महागले आहे, कारण लिंबाच्या किमतीमध्येही जवळपास - 25% वाढ झाली आहे. ५ रुपयाला एक लिंबू या दराने विक्री होत आहे. - गवार, फरसबी, कोबी, फ्लॉवर, तोंडली अशा अनेक भाज्या या किमान २२ ते कमाल ३० रुपये पाव किलोच्या घरात पोहोचल्या आहेत.