- स्थानिक व बाहेरून आवक वाढली : भाव आटोक्यातनागपूर : सणांच्या दिवसात किरकोळ आणि ठोक बाजारात स्थानिक व बाहेरील उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्यामुळे भाव आधीच्या तुलनेत कमी आहेत. गृहिणींचे महिन्याचे बजेट आटोक्यात आहे. एकंदरीत पाहता किमती घसरल्यामुळे भाज्या चविष्ट झाल्याची गृहिणींची प्रतिक्रिया आहे. सिंचनाच्या सोयी वाढल्यानागपूरपासून ३० ते ४० कि़मी. परिसरात सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. तसे पााहता मे व जूनमध्ये भाज्यांची लागवड होते आणि दसऱ्याला भाज्या बाजारात येतात. पण मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ते पीक आता बाजारात येत आहे. गेल्यावर्षी भाज्यांना जास्त भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. परिणामी उत्पादन वाढले, पण भाव कमी झाले. दिवाळीनंतरही भाज्या आटोक्यात राहतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली.फूल कोबी व पालक स्वस्तठोकमधील भावापेक्षा किरकोळमध्ये भाज्यांच्या किमती दुप्पट असतात, असा नेहमीचा अनुभव आहे. हिरवी मिरची, सांबार, गाजर, भेंडी, कारले जास्त किमतीत असून तुलनात्मरीत्या फूल कोबी, पत्ता कोबी, पालक, मेथी, वांगे, मूळा टमाटर, तोंडले आदींचे भाव स्वस्त आहेत. काही वगळता सर्व भाज्या प्रति किलो १५ ते ३५ रुपयांदरम्यान आहेत. नांदेड, छिंदवाडा व नाशिक येथून सांबार, गवार शेंगा हैदराबाद, फूलकोबी औरंगाबाद, पत्ताकोबी मुलताई व मदनपल्ली (आंध्र), तोंडले भिलाई, दुर्ग व रायपूर, परवळ व सिमला मिरची राऊरकेला व टाटानगर, कोहळे यवतमाळ, काकडी जळगाव, गाजर छिंदवाडा, लवकी राजनांदगाव व जबलपूर, टमाटर नाशिक, पालक नाशिक येथून तर मेथी पंढरपूर व बुलडाणा येथून विक्रीस येत आहे. कॉटन मार्केटमध्ये स्थानिक उत्पादकांकडून दररोज लहान-मोठ्या १६० ते १८० गाड्यांची आवक आहे. बॉक्स भाजीपालाकिरकोळ भाव (किलो)वांगे १५ रु.फुलकोबी२० रु.पत्ताकोबी१५ रु.टमाटर२० रु.चवळी २५ रु.पालक२० रु.मेथी ५० रु.तोंडले२० रु.मुळा१५ रु.कोहळे१५ रु.लवकी१० रु.बीन्स ४० रु.वाल शेंग ३० रु.चवळी शेंग २०गवार २०भेंडी२० रु.हिरवी मिरची३० रु.कारले२० रु.सिमला मिरची३० रु.काकडी१० रु.गाजर२५ रु.मुळा२० रु.ढेमस३५ रु.
किमती घसरल्याने भाज्या चविष्ट !
By admin | Updated: September 15, 2015 14:44 IST