वास्को चोरी
By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST
पावणे दोन लाखांचे टी-शर्ट्स दिवसा चोरले
वास्को चोरी
पावणे दोन लाखांचे टी-शर्ट्स दिवसा चोरलेवास्को : येथून तीन किलोमीटरवरील वाडे येथे झालेल्या चोरीत सुमारे एक लाख 75 हजारांचा माल लंपास करण्यात आला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माण टी-शर्ट कंपनीचे उत्पादक राज भांडारे यांनी तक्रार दिलेली आहे. दिवार नावाच्या रेसिडेन्सीमधील गोदामातून सुमारे सातशे टी-शर्ट्स चोरट्याने पळवले. त्याची किंमत सुमारे पावणेदोन लाख रुपये होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक जॉन फर्नांडिस तपास करत आहे.