Join us

रेल्वे अर्थसंकल्पावर उद्योग जगतातून मिळाल्या विविधांगी प्रतिक्रिया

By admin | Updated: February 27, 2015 00:11 IST

प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून रेल्वेच्या भविष्यातील विकासासाठी मांडलेला असा हा अर्थसंकल्प आहे, या शब्दांत उद्योगांची शिखर संघटना असलेल्या 'असोचेम'चे अध्यक्ष राणा कपूर यांनी याचे स्वागत केले आहे.

मुंबई : प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून रेल्वेच्या भविष्यातील विकासासाठी मांडलेला असा हा अर्थसंकल्प आहे, या शब्दांत उद्योगांची शिखर संघटना असलेल्या 'असोचेम'चे अध्यक्ष राणा कपूर यांनी याचे स्वागत केले आहे.रेल्वेचा वेग वाढवितानाच, पायाभूत सुविधांवर भर, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि याकरिता खाजगी उद्योगांचा समावेश अशा अनेक उपायोजनांची घोषणा रेल्वेमंत्री प्रभू यांनी केली आहे. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, आठ ते साडे लाख कोटी रुपयांच्या नियोजनाची घोषणाही त्यांनी केली आहे. त्या अनुषंगानेच विस्तार होणार आहे. रेल्वेचा कायाकल्प करणाऱ्या या योजनांमुळे खाजगी उद्योगाला मोठ्या प्रमाणावर काम करण्यास वाव आहे. याचा फायदा उद्योगांना आणि अर्थातच निर्माण होणाऱ्या सुविधेमुळे प्रवाशांनाही होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. दोन हजार कोटी रुपये खर्चून समुद्राजवळील कनेक्शन समृद्ध करणे यामुळे दक्षिण पर्यटनस्थळांना मोठा फायदा होईल. काश्मीर आणि पूर्वेत्तर राज्यांतही रेल्वे जोडण्याच्या दृष्टीने ठोस घोषणा करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया थॉमस कूकचे व्यवस्थापकीय संचालक माधवन मेनन यांनी दिली.