Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासाला आधार कार्डची सक्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:18 IST

विमानाची तिकिटे खरेदी करण्यासाठी आधार क्रमांकाची सक्ती करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारच्या वतीने खासदारांच्या एका गटाला सांगण्यात आले.

नवी दिल्ली : विमानाची तिकिटे खरेदी करण्यासाठी आधार क्रमांकाची सक्ती करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारच्या वतीने खासदारांच्या एका गटाला सांगण्यात आले.संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रश्न खासदारांनी उपस्थित केला होता. पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वरिष्ठ सरकारी अधिकाºयांनी सांगितले की, अशा प्रकारचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.केंद्रीय गृहसचिव राजीव गुप्ता यांनी सरकारी अधिकाºयांचे नेतृत्व या बैठकीत केले. आधारचा डाटा सुरक्षित आहे. तो चुकीच्या हातात पडण्याची शक्यता नाही. कारण त्याचे सर्व्हर संपूर्णत: सुरक्षित करण्यात आले आहे, असेही अधिकाºयांनी बैठकीत सांगितले.