नवी दिल्ली : अधिकाऱ्यांच्या युजर-आयडी आणि पासवर्डच्या दुरुपयोगामुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक बँका आणि विमा कंपन्यांच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी आकस्मिक निरीक्षण करावे, अशी सूचना केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) केली आहे.अधिकारी आपला युजर-आयडी आणि पासवर्ड अनधिकृत व्यक्तींना सांगतात आणि त्यामुळे बँकिंग क्षेत्र, विमा क्षेत्र, केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि अन्य संगणकीकृत संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडतात, असे आयोगाच्या लक्षात आले आहे. तसेच हे अधिकारी अधूनमधून आपला पासवर्डही बदलत नाहीत. नियमितपणे आपला पासवर्ड बदलणे हा गैरप्रकारांना आळा घालण्याचा चांगला मार्ग आहे, असे सीव्हीसीने सर्व मंत्रालये, बँका, विमा कंपन्या आणि स्वायत्त संस्थांना पाठविलेल्या आपल्या दिशानिर्देशात म्हटले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
युजर आयडी, पासवर्डच्या दुरुपयोगाला आळा घाला!
By admin | Updated: August 3, 2015 22:49 IST