Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जित पटेल यांना सुरक्षा रक्षकाने गेटवरच अडविले

By admin | Updated: September 9, 2016 04:51 IST

नीती आयोगाच्या कार्यालयात प्रवेश करताच रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर यांना तेथील सुरक्षा रक्षकाने अडविले. ओळखपत्र विचारले.

नवी दिल्ली : नीती आयोगाच्या कार्यालयात प्रवेश करताच रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर यांना तेथील सुरक्षा रक्षकाने अडविले. ओळखपत्र विचारले. पण, ते पाहल्यानंतर रक्षकाने लगेच त्यांना पुढे सोडले. विशेष म्हजणे यात कोणतीही हुज्जत न घालता त्यांनी रक्षकाला सुरक्षेचे नियम पाळण्यास मदत करूनच, आयोगाचे कार्यालय गाठले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी गुरुवारी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. सध्याच्या आर्थिक स्थितीवर दोघांनी चर्चा केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पटेल हे पहिल्यांदाच जेटली यांना भेटले. पटेल यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.