Join us  

वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, अभियंत्यांसह अनेक पदांवर निघाली भरती; आजच अर्ज करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 4:36 PM

अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या रिक्त स्थानाचा तपशील, आवश्यक संकेतस्थळे या बातमीमध्ये दिले आहेत.

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या विविध विभागांत नोकर भरती निघाली आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (यूपीएससी) अनेक वेगवेगळ्या पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक अभियंता, वैद्यकीय अधिकारी, आर्किटेक्ट यासह अनेक पदांवर सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. यासाठी यूपीएससीने आपल्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर एक अधिसूचना जारी केली आहे. अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या रिक्त स्थानाचा तपशील, आवश्यक माहिती बातमीमध्ये दिली आहे.पदांची माहितीवैद्यकीय अधिकारी / संशोधन अधिकारी - 36 पदेसहाय्यक अभियंता-  3 पदेविशेषज्ञ ग्रेड 3 सहाय्यक प्राध्यापक - 60 पदेवरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - 21 पदेआर्किटेक्ट (गट अ) - 1 पदेएकूण पदांची संख्या - 121अर्ज माहितीया भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 24 जुलै 2020.अर्ज करण्याची अंतिम तारीख - 13 ऑगस्ट 2020ऑनलाइन अर्ज छपाईची अंतिम तारीख - 14 ऑगस्ट 2020अर्ज फी - एससी, एसटी, महिला आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. इतर सर्व प्रकारच्या उमेदवारांना 25 रुपये अर्ज फी भरावी लागेल.आवश्यक पात्रतावेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी मागविण्यात आली आहे. या सूचनेमध्ये आपल्याला सविस्तर माहिती मिळेल.कमाल वयोमर्यादा देखील सर्व पदांसाठी स्वतंत्रपणे निश्चित केली गेली आहे वैद्यकीय अधिकारी - 35 वर्षेसहाय्यक अभियंता - 30 वर्षेसहाय्यक प्राध्यापक - 40 वर्षेवरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - 35 वर्षेआर्किटेक्ट - 40 वर्षे