Join us

विनाअनुदानित गॅस महागला

By admin | Updated: December 2, 2015 00:57 IST

विमानाच्या इंधनाच्या (एव्हिएशन टर्बाईन फ्युअल) दरात १.२ टक्के कपात, तर विना अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात ६१.५० पैशांची वाढ करण्यात आली.

नवी दिल्ली : विमानाच्या इंधनाच्या (एव्हिएशन टर्बाईन फ्युअल) दरात १.२ टक्के कपात, तर विना अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात ६१.५० पैशांची वाढ करण्यात आली.एटीएफचा दिल्लीतील दर किलोलिटरमागे ५२६.२ (१.२ टक्के) कपात होऊन ४४,३२०.३२ रुपये झाला. हिंदुस्थान पेट्रोलिमय, इंडियन आॅईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलिमय या तेल कंपन्यांनी मंगळवारी ही घोषणा केली. गेल्या आॅक्टोबरपासून दरात झालेली ही तिसरी कपात आहे. आतापर्यंत एकूण कपात किलोलिटरमागे २,९१४.९८ रुपये झाली आहे.