Join us

विनाअनुदानित सिलेंडर आणि विमान इंधन झाले स्वस्त

By admin | Updated: January 1, 2015 14:14 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घटणा-या किंमतीमुळे विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात ४३ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १ - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घटणा-या किंमतीमुळे विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात ४३ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. तर विमानातील इंधनाच्या दरातही १२.५ टक्क्यांनी घट झाली आहे. 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सातत्त्याने घट होत असून यामुळे भारतातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले आहेत. गुरुवारी विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये ४३ रुपये ५० पैशांची कपात जाहीर केली गेली. मुंबईत १४.२ किलोग्रॅम वजनाचा विनाअनुदानित घरगुती सिलेंडर जो पूर्वी ७७० रुपये ५० पैशांना मिळायचा तो आता ७२५ रुपये ५० पैशांमध्ये मिळणार आहे. ग्राहकाला एका वर्षाला १२ अनुदानित घरगुती सिलेंडर मिळणार असून त्यापेक्षा जास्त सिलेंडर लागल्यास ग्राहकाला विनाअनुदानित सिलेंडर घ्यावा लागेल. विना अनुदानित सिलेंडरमध्ये दर कपातीची ही १४ वी वेळ आहे.