Join us
Daily Top 2Weekly Top 5

यूबीएलचे चेअरमनपद विजय मल्ल्यांकडेच?

By admin | Updated: September 8, 2016 04:58 IST

बीएल कंपनीमधील विजय मल्ल्या यांचे समभाग अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले असले तरी कंपनीच्या चेअरमन पदावर मल्या हेच कायम राहतील

बंगळुरू : युबीएल कंपनीमधील विजय मल्ल्या यांचे समभाग अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले असले तरी कंपनीच्या चेअरमन पदावर मल्या हेच कायम राहतील, असे युनायटेड बृुवरीज लिमिटेडच्या (यूबीएल) व्यवस्थापनाने म्हटले आहे. कंपनीचे एक संचालक चूग योगेंद्र पाल यांच्या अध्यक्षतेखाली कंपनीची सर्वसाधारण सभा झाली. कायद्यानुसार मल्ल्या हे चेअरमनपदी कायम राहू शकतात. या क्षणापर्यंत ईडीने कोणतीही मालमत्ता अथवा समभाग प्रत्यक्षात जप्त केलेले नाहीत, तसेच चेअरमनपदी बसण्यापासून त्यांना बंदीही घातलेली नाही, असेही पाल म्हणाले. ईडीने मल्ल्या यांचे समभाग ताब्यात घेतल्यामुळै त्यांना यूबीएलचे चेअरमनपद गमवावे लागू शकते, असे वृत्त आले होते. या पार्श्वभूमीवर यूबीएल व्यवस्थापनाने मल्ल्या यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे मानले जात आहे. ५ सप्टेंबर रोजी ईडीने मल्ल्या यांची ६,६३0 कोटींची मालमत्ता जप्तीची नोटीस काढली. मल्ल्या यांचे फार्महाऊस, फ्लॅटस्, ठेवींवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. (वृत्तसंस्था)