Join us

उबेरच्या ५७ दशलक्ष ग्राहकांचा डाटा चोरीस, ई-मेल, मोबाइल क्रमांकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 03:45 IST

सॅन फ्रान्सिस्को : उबेरचे ५७ दशलक्ष ग्राहक आणि चालक यांचा डाटा २०१६ मध्ये दोन हॅकरांनी चोरला असल्याचे उघडकीस आले आहे.

सॅन फ्रान्सिस्को : उबेरचे ५७ दशलक्ष ग्राहक आणि चालक यांचा डाटा २०१६ मध्ये दोन हॅकरांनी चोरला असल्याचे उघडकीस आले आहे. स्वत: उबेरनेच ही माहिती दिली आहे. चोरी गेलेल्या डाटात ई-मेल, मोबाइल फोन क्रमांक आणि ६ लाख चालकांचे वाहन चालविण्याच्या परवान्याचे क्रमांक याचा समावेश आहे, असे कंपनीने सांगितले.उबेर ही अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा देणारी बहुराष्टÑीय कंपनी आहे. कंपनीचे सीईओ दारा खोसरोवशाही यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये यासंबंधीच्या खुलासा केला आहे. तिसºया पक्षाच्या क्लाऊड आधारित सेवेत ठेवलेला डाटा २०१६ च्या अखेरीस दोन हॅकरांनी चोरल्याचे आम्हाला समजले. आमची कॉर्पोरेट सिस्टिम अथवा पायाभूत क्षेत्राला याचा कोणताही फटका बसला नव्हता.

टॅग्स :उबर