Join us

यूएईचे शिष्टमंडळ मुंबईला येणार

By admin | Updated: August 19, 2015 22:35 IST

भारतासोबतचे आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या व्यावसायिकांचे एक शिष्टमंडळ मुंबईच्या चार दिवसांच्या भेटीवर येणार आहे.

दुबई : भारतासोबतचे आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या व्यावसायिकांचे एक शिष्टमंडळ मुंबईच्या चार दिवसांच्या भेटीवर येणार आहे. दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटरचे (डीआयएफसी) हे शिष्टमंडळ सोमवारी मुंबईत पोहोचेल. डीआयएफसीचे उपप्रमुख आरिफ आमिरी यांनी सांगितले की, दुबईला भारतात थोडी ओळख होण्याची गरज आहे. भारताला नवीन बाजार आणि ताज्या संधीची दारे उघडून देण्यासाठी डीआयएफसी प्रयत्न करील. भारताला अमाप संधी असल्याचे दिसत आहे.