दोन हजार शिवभक्तांचा राजेश्वराला जलाभिषेक जय बाभळेश्वर संस्थानची कावड ठरली आकर्षण
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST
अकोला : जुने शहरातील रेणुकानगरस्थित जय बाभळेश्वर शिवभक्त संस्थानच्या तब्बल दोन हजार शिवभक्तांनी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला. १०१ भरण्यांची कावड, आकर्षक देखावा, लेजीम पथकांचा समावेश व संस्थानची शिस्तबद्ध परिक्रमा शहरात कौतुकाचा विषय ठरली.
दोन हजार शिवभक्तांचा राजेश्वराला जलाभिषेक जय बाभळेश्वर संस्थानची कावड ठरली आकर्षण
अकोला : जुने शहरातील रेणुकानगरस्थित जय बाभळेश्वर शिवभक्त संस्थानच्या तब्बल दोन हजार शिवभक्तांनी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला. १०१ भरण्यांची कावड, आकर्षक देखावा, लेजीम पथकांचा समावेश व संस्थानची शिस्तबद्ध परिक्रमा शहरात कौतुकाचा विषय ठरली. अकोलेकरांचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या शिवलिंगाला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्याची परंपरा बाभळेश्वर संस्थानने मागील १६ वर्षांपासून जोपासली आहे. यंदाही संस्थानच्यावतीने १०१ भरण्यांची कावड काढण्यात आली. कावडवर जय बाभळेश्वर मंदिरासह शिवलिंगाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. कावडमध्ये ग्राम राजंदा येथील आखाड्याचे २०० जणांच्या लेजीम पथकाचा समावेश होता. तसेच ग्राम बारलिंगा, रिधोरा, भौरद, डाबकी, अमानतपूर ताकोडा येथील युवकांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. संस्थानच्यावतीने तब्बल २ हजार शिवभक्तांनी २५ ऑगस्ट रोजी राजेश्वराला जलाभिषेक केला. चौकट....देशाचे रक्षण करणार्या जवानांसाठी टी-शर्ट रवानाभारत मातेचे रक्षण करणार्या जम्मू-काश्मीरमधील भारतीय जवानांमध्ये एकोपा व एकतेची भावना निर्माण होण्याच्या उद्देशातून संस्थानच्यावतीने १०० टी-शर्ट दरवर्षी पाठविले जातात. यंदाही टी-शर्ट पाठविण्यात आल्याची माहिती संस्थानच्यावतीने देण्यात आली.-फोटो-२६ सीटीसीएल-४२-