Join us

दुचाकीच्या धडकेत दोन ठार

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST

शेवगाव (जि. अहमदनगर) : शेवगाव-नगर रस्त्यावरील अमरापूर येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झालेल्या अपघातात दोन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मरण पावलेले दोघेही मोटारसायकल चालवित होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

शुक्रवारी विजयादशमीच्या दिवशी रात्री ९ च्या सुमारास पैठण तालुक्यातील दादेगाव जहागीर येथील कृष्णा रतन घोडके हे सचिन शरद घोडके व लखन शरद घोडके यांच्यासह मोटारसायकलवरून मोहटादेवीकडे दर्शनाकरिता निघाले होते. त्याचवेळी कैलास बाबुराव धोत्रे (रा. शेवगाव) हे राहुल नामदेव म्हस्के (रा. पवारवस्ती, शेवगाव) यांच्यासोबत मोटारसायकलवरून शेवगावकडे येत होते. दोन्ही मोटारसायकलची अमरापूर येथील शिवपार्वती पेट्रोल पंपासमोर धडक झाली. त्यात कृष्णा रतन घोडके (२०) व कैलास बाबुराव धोत्रे (२७) हे दोघे जागीच ठार झाले असून, अन्य तीन जण जबर जखमी झाले. जखमींवर नगरमध्ये उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)