राम जाधव - जळगावजागतिक व राष्ट्रीय बाजारपेठेत जरी सराफा बाजारात चढउतार असले, तरी आता लग्नसराई संपल्याने सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या बाजारपेठेत सोन्याच्या खरेदीत जवळपास ३० ते ४० टक्यांपर्यंत घट आल्यामुळे सराफा बाजारातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर थंडावली आहे़ गुरुवारी सोन्याचे भाव २७,४०० रुपयांपर्यंत उतरले होते़ तरीही बाजारात गर्दी नसल्याचेच दिसले़सोन्याचे भाव १०० रुपयांनी उतरले, तर चांदीचेही किरकोळ विक्रीचे भाव ७०० रुपयांनी घसरुन ३९,५०० रु़ प्रतीकिलो पर्यंत खाली आले आहेत़ तसेच चांदीच्या ठोक भावातही ४०० रुपयांची घट होवून ते ३८,५०० वर आले आहेत़ त्यामुळे स्थानिक सराफा बाजारात सध्या तरी मंदीचेच वातावरण दिसत आहे़ यावर लग्नसराई आटोपल्याचा मोठा परिणाम असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले़४गेल्या आठवड्यात सोन्याचे किरकोळ विक्रीचे भाव २७,८०० रुपयांवर दोन ते तीन दिवस स्थिर होते़ त्यानंतर गुरुवारी २८ रोजी ते २७,८५० रुपयांपर्यंत पोहोचले होते़ मात्र लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा सोन्याचे भाव घसरुन ते २७,५०० पर्यंत खाली आले होते़ शुक्रवारी मात्र त्यामध्ये ५० रुपयांनी वाढ होवून ते २७,५५० वर पोहोचले व बुधवारपर्यंत स्थिर राहिले़४स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात गुरूवारी पुन्हा १०० रुपयांनी घट झाली़ तसेच चांदीच्याही किरकोळ विक्रिच्या भावात उतार होवून ते ३८,५०० वर पोहोचले आहेत़ अजूनही भाव उतरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे़४जिल्हाभरात सध्या उन्हाचा जोर कायमच असला तरी शेतीकामांना गती मिळालेली आहे़ त्यामुळे शेतकरी वर्गही बाजारपेठेत खरेदीपेक्षा शेतीकामांनाच प्राधान्य देत असल्याने मोजकेच ग्राहक सध्या खरेदी करित असल्यान बाजारात शांतता आहे़गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोन्याच्या किरकोळ विक्रीच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाही़ सध्या लग्नसराई संपल्यामुळे जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी विक्रीमध्ये घट आली आहे़ साहजिकच त्याचा परिणाम सराफा बाजारवर होत आहे़- पप्पू बाफना, सराफा व्यापारी़
सराफा बाजारातील उलाढाल घटली
By admin | Updated: June 5, 2015 23:56 IST
जळगावच्या बाजारपेठेत सोन्याच्या खरेदीत जवळपास ३० ते ४० टक्यांपर्यंत घट आल्यामुळे सराफा बाजारातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर थंडावली आहे़ गु
सराफा बाजारातील उलाढाल घटली
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}