Join us

टीव्ही ऑन करा आणि घरातील डास बाहेर घालवा..!

By admin | Updated: June 8, 2016 18:10 IST

तुमच्या घरातील टीव्ही जर तुम्हाला मनोरंजनासोबतच घरातील मच्छर बाहेर घालवण्यास मदत करायला लागला तर ? हो... आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, कारण तसा टीव्ही बाजारात आलाय.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ -  तुमच्या घरातील टीव्ही जर तुम्हाला मनोरंजनासोबतच घरातील डास बाहेर घालवण्यास मदत करायला लागला तर ?  हो... आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, कारण तसा टीव्ही बाजारात आलाय. 
दक्षिण कोरियास्थित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एलजीने अशा प्रकारचा एक टीव्ही बाजारात आणलाय. हा टीव्ही मनोरंजनासोबतच आपल्या घरातील डासांना बाहेर घालवण्यास मदत होणार आहे. एलजीच्या या टीव्हीचे नाव 'मॉस्किटो अवे टीव्ही' असे आहे. 
भारतातील ग्राहकांना नजरेसमोर ठेवून हा 'मॉस्किटो अवे टीव्ही' विकसित करण्यात आला आहे. यामध्ये अल्ट्रा सॉनिक डिव्हाईसचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे टीव्ही ऑन केल्यास कोणत्याही प्रकारची प्राणघातक हाणी न होता घरात असलेले डास बाहेर काढण्यास मदत होते.  
सुरुवातीला भारतीय बाजारात 'मॉस्किटो अवे टीव्ही'ची किंमत १६,९०० रुपयांपासून ते ४७,५०० रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. तसेच, एलजीच्या ठराविक स्टोअरमध्ये या टीव्हीची विक्री करण्यात येणार आहे.