Join us
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळ ...१ ..

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST


संबंधित फोटो घेता येईल. ..

तूर डाळीची चमक आणखी वाढणार
- ठोकमध्ये ५०० रु.ची वाढ : ग्राहकांपुढे पर्याय

नागपूर : कमी पावसामुळे यावर्षीच्या मोसमात तुरीचे पीक कमी आले आहे. त्याच कारणांमुळे दोन वर्षांआधी प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचलेली तूर डाळ यावर्षी विक्रम मोडण्याच्या शक्यता आहे. सध्या चांगल्या प्रतीची डाळ ९० रुपये विकली जात आहे. ठोक बाजारात १५ दिवसांत प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे.
तूर डाळीची विक्री घटली
वाढीव तूर डाळीचा उच्च मध्यमवर्गीयांवर काहीही परिणाम होत नाही. चांगल्या प्रतीची डाळ खरेदीकडे त्यांचा ओढा असतो. खरा फटका मध्यमवर्गीय आणि गरिबांना बसतो. तूर डाळीला पर्याय म्हणून वाटाणा व लाखोळी डाळ खरेदी करतात. विविध डाळींचे वाढताच विक्री २५ टक्क्यांपर्यंत खाली येते. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसतो. सध्या हीच स्थिती आहे. मूग मोगर, उडद आणि तूर डाळीचे दर उच्चांकावर गेले आहेत. किरकोळ बाजारात तूर डाळ प्रति किलो ८० ते ९० रुपयांदरम्यान आहेत. परिणामी विक्रीत प्रचंड घट झाल्याची माहिती धान्य असोसिएशनचे सचिव आणि धान्य समीक्षक प्रताप मोटवानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. यावर्षी नवीन माल येण्याची चाहूल लागताच मिल चालकांनी जुना माल विक्रीस काढला. नवीन मालांनी दाल मिल सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. पण नवीन मालाचे दर प्रारंभीच उच्चांकावर गेले. वाढीव तूर डाळीचा फटका व्यापाऱ्यांनाच बसत असल्याने अनेकांनी अजूनही मिल सुरू केलेली नाही.
चणा डाळ वधारणार
गेल्यावर्षी चण्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना या पिकाकडे दुर्लक्ष केले. शिवाय पाऊस कमी झाल्याने उत्पादन घटले. त्याच कारणामुळे गेल्यावर्षी प्रति क्विंटल २४०० रुपयांपर्यंत खाली आलेल्या चण्याचे भाव यावर्षी ३५०० ते ३६०० रुपयांवर गेले आहेत. परिणामी ठोक बाजारात डाळीचे भाव प्रति क्विंटल ४२०० ते ४८०० रुपयांवर पोहोचले आहेत. होळीनंतर भाव वाढण्याची शक्यता मोटवानी यांनी व्यक्त केली.