Join us

तुरीला आठ हजार रुपये भाव

By admin | Updated: December 5, 2015 00:46 IST

राज्यात तूर कडधान्य पिकाला डिसेंबर महिन्यात सरासरी ७,५०० ते ८००० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र

अकोला : राज्यात तूर कडधान्य पिकाला डिसेंबर महिन्यात सरासरी ७,५०० ते ८००० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी व केंद्रीय कृषी विपणन माहिती केंद्राने वर्तविला आहे. भारतात तुरीचे क्षेत्र दोन दशकात ३.५ ते ४ लाख हेक्टर असून, उत्पादन जवळपास २.५ ते ३ लाख टन आहे. भारतीय कृषी संचालनालयानुसार २०१४-१५ मध्ये २.७८ लाख टन होते. इतर कडधान्य पिकाप्रमाणे तूर कोेरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. तुरीखालील ९६ टक्के क्षेत्र हे असिंचित आहे. तुरीखालील क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमाकांवर आहे.