Join us  

स्वस्तात विमान प्रवासाची ऑफर! एअर एशियाचे तिकीट फक्त 999 रुपयात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 7:09 PM

हवाई प्रवास आता सर्वसामान्यांच्या अवाक्यात आला आहे. दिवसेंदिवस हवाई प्रवाशांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्दे एअर एशियाने '7 डे स ऑफ मॅड डील्स' ही ऑफर आणली आहे. 

नवी दिल्ली, दि. 22 - हवाई प्रवास आता सर्वसामान्यांच्या अवाक्यात आला आहे. दिवसेंदिवस हवाई प्रवाशांची संख्या वाढत आहे. एअर एशियाने आता स्वस्तात हवाई प्रवाशाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. विशेष प्रमोशनल स्कीमतंर्गत काही निवडक मार्गांवरचे एअर एशियाचे तिकीट तुम्ही 999 रुपयात बुक करु शकता. एअर एशियाने '7 डे स ऑफ मॅड डील्स' ही ऑफर आणली आहे. 

या ऑफरअंतर्गत तुम्ही 21 ऑगस्ट 2017 ते 27 ऑगस्ट 2017 या कालावधीत तिकीट बुक करु शकता. या तिकीटांमध्ये सर्व करांचा समावेश असेल. बुक केलेल्या तिकीटावर तुम्ही 26 फेब्रुवारी ते 28 ऑगस्ट 2018 या कालावधीत प्रवास करु शकता. ऑनलाइन किंवा एअर एशियाच्या अॅपवरुन तुम्हाला हे तिकीट बुक करता येईल. 

काही दिवसांपूर्वी विस्तारा विमान कंपनीने स्वस्त हवाई प्रवासाची ऑफर जाहीर केली होती. विस्ताराने 'फ्रीडम टू फ्लाय' या ऑफरअंतर्गत हवाई तिकिटावर घसघशीत डिस्काऊंट दिला होता. या योजनेमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट 799 रुपये तर, प्रिमियम इकॉनॉमी वर्गाचे तिकीट 2,099 रुपये होते. मर्यादीत कालावधीसाठी ही ऑफर होती.  या ऑफरमध्ये 23 ऑगस्ट 2017  ते 19 एप्रिल 2018 या कालावधीसाठी तिकीट बुकिंग होते. या ऑफरमुळे प्रवाशांना गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, कोच्ची, गुवहाटी, अमृतसर आणि भुवनेश्वर या पर्यटनस्थळी जाण्याचा अॅडव्हान्स प्लान करण्याची संधी मिळाली. या ऑफर अंतर्गत दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या मेट्रो शहरांचा सुद्धा प्रवास करता येईल. 

एअर इंडियाची होती ऑफरमागच्या महिन्यात एअर इंडियाने सर्वात स्वस्त 706 रुपयात हवाई प्रवासाची ऑफर दिली होती.  एअर इंडियाने मान्सून ऑफरमध्ये देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट अवघ्या 706 रुपयांपासून उपलब्ध होते. एअर इंडियाची ही ऑफर 1 जुलै ते 20 सप्टेंबर या कालावधीसाठी होती. त्यासाठी 17 जून ते 21 जून दरम्यान तिकीट बुक करावं लागणार होतं. एअर इंडियाचं बुकिंग ऑफिस, अधिकृत ट्रॅव्हल्स एजंट वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून तिकीट बूक केलेल्यांना या ऑफरचा लाभ घेता आला. ठरावीक शहरांमधील प्रवासासाठीच ही ऑफर होती. 

टॅग्स :विमानतळ