Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या कारभारात पारदर्शकता हवी

By admin | Updated: February 25, 2017 00:51 IST

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतून वाढत्या थकीत कर्जांमुळे सामान्या माणसाची बचत धोक्यात आली आहे. या थकीत कर्जांमागे सरकारचे हितसंबंध गुंतलेले आहेत

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतून वाढत्या थकीत कर्जांमुळे सामान्या माणसाची बचत धोक्यात आली आहे. या थकीत कर्जांमागे सरकारचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि त्यामुळेच ही लूट शक्य झाली असल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केला. सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांचा एकूणच कारभार पारदर्शक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबई येथे महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनतर्फे कॉ. के.के. मंडल स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाढती थकीत कर्जे: बँकांवरील दरोडा या विषयावर प्रशांत भूषण बोलत होते.सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची वाढती थकीत कर्जे शेती किंवा छोट्या उद्योगांमुळे धोक्यात आलेली नाही तर मोठ्या उद्योगांनी हा पैसा लुटला आहे. ही लूट थांबायला हवी. सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय म्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. भालचंद्र कांगो होते. सभेच्या प्रारंभी थकीत कर्जावरील माहितीपट दाखवण्यात आला. यावेळी बँकांतील थकीत कर्जाविषयी माहिती देणारी एक पुस्तीकाही देण्यात आली. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक स्टेट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कॉ. देविदास तुळजापूरकर तर आभार प्रदर्शन अध्यक्ष कॉ. नंदकुमार चव्हाण यांनी केले. (वाणिज्य प्रतिनिधी)