Join us

ठाणे महापौर मॅरेथॉनसाठी वाहतुकीत बदल रविवारी ९ तासांसाठी : सकाळी ६ पासून दुपारी ३

By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST

ठाणे - ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी आयोजित पंचविसाव्या ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेस येणारे हजारो स्पर्धक आणि ती पाहण्यासाठी जमणार्‍या ठाणेकरांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्या दिवशी शहरातील वाहतुकीत तब्बल ९ तासांसाठी बदल करण्यात आला आहे. हा बदल सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिली.

स्पर्धेची सुरुवात ठाणे महानगरपालिका भवन येथून होणार असल्याने नितीन क ंपनी जंक्शनकडून महापालिका भवनमार्गे अल्मेडा चौकाकडे जाणार्‍या सर्व वाहनांना नितीन कंपनीजवळ प्रवेशबंदी केली आहे. तसेच नितीन सिग्नल ते तीनहात नाका सर्व्हिस रोडने जाणार्‍या वाहनांना तेथेच प्रवेशबंदी क रण्यात आली आहे. तीनहात नाका -हरिनिवास सर्कल-तीन पेट्रोलपंप-गजानन महाराज चौक-दगडी शाळा-सेंट जॉन बाप्टिस्ट शाळा-टिळक चौक-सिव्हील हॉस्पिटल कॉर्नर-उथळसर-माँ मीनाताई ठाकरे चौकापर्यंतच्या रस्त्यांवर वाहनांना बंद केला आहे. गोल्डन डाइज नाका ते तीनहात नाक्याकडे पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पूर्व बाजूकडील सर्व्हिस रोडने जाणार्‍या वाहनांना तीनहात नाका येथेच प्रवेशबंदी आहे. तीनहात नाका ते मॉडेला नाका रस्त्याच्या डावीकडील बाजूला बंदी घातली असली तरी उजवीकडील बाजू दुहेरी वाहतुकीसाठी खुली ठेवली आहे.
मॅरेथॉनच्या मार्गावर ठामपा भवन, अल्मेडा रोड, पूर्व द्रुतगती मार्गाच्या पूर्व बाजूकडील सर्व्हिस रोड-तीनहात नाका ते हरिनिवास सर्कल, तीन पेट्रोलपंप या मार्गांसह मानपाडा-घोडबंदर रोड-ब्रšाांड नाका ते क्लॅरियंट कंपनी-ब्रšाांड नाका ते गोल्डन डाइज नाका ते तीनहात नाका (सर्व्हिस रोड) या रस्त्यावरील दोन्ही बाजूंना वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. मात्र, ही बंदी पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच मॅरेथॉन स्पर्धेतील वाहनांना लागू नसल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली.
* घोडबंदर रोडकडून मानपाडामार्गे ठाण्याकडे जाणार्‍या सर्व जड-अवजड वाहनांना सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंदी घातली असून ही वाहने चिंचोटी नाका-भिवंडी,अंजूरफाटा-अंजूर चौक, माणकोली-खारेगाव टोलनाका-मुंब्रा बायपास पुढे जाता येणार आहे.
......
(प्रतिनिधी

वाचली -नारायण जाधव