Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर अधिकाऱ्यांकडून पिळवणूक होण्याची सराफा व्यापाऱ्यांना भीती

By admin | Updated: March 31, 2016 02:29 IST

ज्वेलरी उद्योगावर एक टक्का अबकारी कर आकारल्याच्या मुद्यावर व्यापाऱ्यांनी संपाची धार तीव्र केली आहे. या कराच्या आकारणीमुळे कर अधिकारी पिळवणूक करतील, अशी भीती व्यापारी वर्गात व्यक्त होत आहे.

मुंबई : ज्वेलरी उद्योगावर एक टक्का अबकारी कर आकारल्याच्या मुद्यावर व्यापाऱ्यांनी संपाची धार तीव्र केली आहे. या कराच्या आकारणीमुळे कर अधिकारी पिळवणूक करतील, अशी भीती व्यापारी वर्गात व्यक्त होत आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दागिन्यांवरील कराचा उल्लेख केला. इनपूट क्रेडिटसह १ टक्का अबकारी कर दागिन्यांवर लावण्यात येणार आहे. इनपूट क्रेडिटविना हा कर १२.५ टक्के होईल, असे जेटली यांनी सांगितले होते. या कराच्या निमित्ताने अधिकारी ‘सक्रिय’ होतील तसेच या निमित्ताने अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना पिळवणूक होण्याची भीती वाटते. हे अधिकारी दुकानावर धाड घालून कराचा तगादा लावू शकतात असे व्यापाऱ्यांना वाटते. एकिकडे सरकार कर आकारणी करत असले तरी सराफा व्यापाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांकडे मात्र फारसे लक्ष देत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपामुळे राज्यात आजवर सुमारे ७० टन मौल्यवान धातूचा व्यवहार ठप्प झाला आहे. (प्रतिनिधी)सोने खरेदीवर पॅनकार्ड सक्ती अव्यवहार्यकर अधिकारी कर वसुलीसाठी व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन वसुली करणार नाहीत अथवा तशी पिळवणूक करणार नसल्याची ग्वाही जरी सरकारने दिली असली तरी याची शाश्वती व्यापाऱ्यांना नाही. याचसोबत दुसरा मुद्दा म्हणजे, पॅन कार्डाचा. दोन लाख रुपये व त्यावरील सोने व ज्वेलरी खरेदीसाठी पॅन कार्ड सरकारने सक्तीचे केले आहे. सोने व मौल्यवान धातूंच्या किमती लक्षात घेता व एकूणच लग्नसराई अथवा विविध सोहळ््यांत होणारी खरेदी लक्षात घेता ही मर्यादा फारच कमी आहे, ती किमान दहा लाख रुपये करावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. परंतु, त्याकडेही सरकारने फारसे लक्ष दिलेले नाही.