Join us

पर्यटन उद्योग आयटीला मागे टाकू शकतो

By admin | Updated: January 14, 2017 01:34 IST

योग्य पावले उचलल्यास पर्यटन उद्योग आयटी सेवा उद्योगालाही मागे टाकू शकतो, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी

हैदराबाद : योग्य पावले उचलल्यास पर्यटन उद्योग आयटी सेवा उद्योगालाही मागे टाकू शकतो, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. अमेरिकेच्या इमोरी विद्यापीठातील मार्केटिंग विभागाचे प्राध्यापक जगदीश एन. सेठ यांनी सांगितले की, आयटी सेवा उद्योग सध्या १५0 अब्ज डॉलरचा आहे. यात बहुतांश मिळकत सॉफ्टवेअर निर्यातीतून होते. पर्यटन उद्योग सध्या १२0 अब्ज डॉलरचा आहे. तो ७.५0 टक्क्यांनी वाढत आहे. आयटी सेवा क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. क्लाउड आणि मोबाईल प्लॅटफॉर्मच्या प्रसाराबरोबर ही स्पर्धा वाढत चालली आहे. २0 वर्षांपूर्वी आयटी सेवा क्षेत्र जेवढ्या मोठे होते, तेवढे आता राहिलेले नाही. येथे आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, आयटी सेवा क्षेत्राची सुरूवात छोट्या व्यवसायापासून झालेली आहे. पर्यटन क्षेत्राला आयटीकडून शिकण्याची गरज आहे. सेठ म्हणाले की, पर्यटन क्षेत्राला अधिकाधिक स्पर्धात्मक करण्यासाठी या क्षेत्रात आॅनलाईन पेमेंट व्यवस्था करण्याची गरज आहे. पर्यटकांना विना अडथळा पैशांची अदायगी करता यावी, यासाठी हे आवश्यक आहे. जेव्हा पर्यटक भारतात येतात, तेव्हा त्यांना सर्वप्रथम चलन बदलून घेण्यासाठी एक्सचेंजची ठिकाणे शोधावी लागतात. आॅनलाईन आदायगीची व्यवस्था झाल्यास हा त्रास वाचू शकेल. (वृत्तसंस्था)