Join us  

रिलायन्स इंडस्ट्री बनली भारतातली नंबर 1 कंपनी, जाणून घ्या पूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 3:55 PM

बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्री (RIL) देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे.

नवी दिल्लीः बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्री (RIL) देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरनं घेतलेल्या उसळीनं कंपनीचं बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांच्या पार केलं आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या 2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सरकारी कंपनी इंडियन आईल कॉर्पोरेशन (IOC)ला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्री सर्वात मोठी कंपनी बनली आहे.पेट्रोलियमपासून रिटेल आणि टेलिकॉमसारख्या विविध क्षेत्रात विस्तारलेल्या आरआयएलनं वर्ष 2018- 19मध्ये एकूण 6.23 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर आयओसीनं 31 मार्च 2019मधल्या वित्त वर्षात 6.17 लाख कोटी रुपयांचं व्यवहार केला होता. आरआयएलनं आयओसीच्या दुप्पट फायदा कमावून देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्री कंपनीचे शेअर्स (नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 2:15वाजताच्या दरम्यान) दोन टक्क्यांनी वाढून 1278 रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे कंपनीचं बाजार भागभांडवल 8.07 लाख कोटी रुपये झालं. आता दुसऱ्या नंबरवर टीसीएस ही कंपनी आहे. देशातली टॉप 10 कंपन्यांची लिस्ट(1) रिलायन्स इंडस्ट्रीज(2) टीसीएस (टाटा कंस्लटन्सी सर्व्हिसेस)(3) HDFC बँक(4) HDFC लिमिटेड(5) HUL (हिंदुस्तान युनिलीवर लिमिटेड)(6) ITC (इंडियन टोबॅको कंपनी)(7) SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया)(8) इन्फोसिस(9) कोटक महिंद्रा बँक(10) ICICI बँक

टॅग्स :मुकेश अंबानी