ज्ञानसागर पुस्तक प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST
अकोला: येथील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये सुरू असलेल्या ज्ञानसागर पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा आज शेवटचा दिवस आहे.
ज्ञानसागर पुस्तक प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
अकोला: येथील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये सुरू असलेल्या ज्ञानसागर पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा आज शेवटचा दिवस आहे.प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील नामवंत प्रकाशनाची व लेखकांची इंग्रजी, मराठी, विविध विषयांची १ लाख पुस्तके उपलब्ध असून, यामध्ये धार्मिक, शैक्षणिक, ज्योतिष्य, आरोग्य, पाकशस्त्र, खेळ, संगीत, चित्रकला, नाटक, कविता कायदेविषयक, कथा-कादंबर्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.पुस्तकांच्या खरेदीवर विविध आकर्षक डिस्काऊंट योजना देण्यात येत आहेत. तरी पुस्तकप्रेमी जनतेने याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानसागर ग्रंथयात्राच्या वतीने करण्यात आले आहे.