Join us

थकीत कर्ज ३ लाख ६१ हजार कोटी!

By admin | Updated: March 24, 2016 00:37 IST

बँकांच्या थकीत कर्जाची रक्कम तीन लाख ६१ हजार कोटी रुपये झाल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी ३९ हजार ८५९ कोटी रुपयांचे थकीत कर्ज हे खाजगी बँकांचे असल्याची माहिती आहे.

मुंबई : बँकांच्या थकीत कर्जाची रक्कम तीन लाख ६१ हजार कोटी रुपये झाल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी ३९ हजार ८५९ कोटी रुपयांचे थकीत कर्ज हे खाजगी बँकांचे असल्याची माहिती आहे. बँका व त्यांचे थकीत कर्ज आणि त्या कर्जाची वसुली याचा आढावा केंद्रीय वित्तमंत्रालयाने मंगळवारी घेतला. त्या बैठकीत ही माहिती पुढे आली आहे.थकीत कर्जाचे प्रमाण वाढल्यानंतर केंद्रीय वित्तमंत्रालयाच्या पातळीवरून आता नियमितपणे बँकांसोबत बैठक घेत वसुलीचा आढावा घेतला जातो. याच अनुषंगाने मंगळवारी वित्तमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सरकारी बँकांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान ही आकडेवारी पुढे आली आहे.थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँका नेमकी काय पावले उचलत आहेत, त्याला कसा प्रतिसाद मिळत आहे, आणि त्यांना अधिक काटेकोरपणे नेमके काय करता येईल,यावर या बैठकीत प्रामुख्याने विचार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. मोठ्या कंपन्या आणि वैयक्तिक कर्जदारांच्या थकीत कर्जाचा आढावा घेतल्या गेलेल्या या बैठकीत किंगफिशर कंपनीने थकविलेले कर्ज हा मुख्य मुद्दा होता. (प्रतिनिधी)